आमदार राजू नवघरे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  Pudhari
हिंगोली

Yeldari Dam Water Release | दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा: येलदरी-सिद्धेश्वर धरणातून रब्बीसाठी तीन आवर्तने

चौथ्या आवर्तनासाठी आमदार राजू नवघरे यांचे प्रयत्न सुरू

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Siddheshwar Dam Rabbi Rotation

वसमत : येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूर्णा प्रकल्पातून सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी तीन पाणी आवर्तने सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना चौथे आवर्तनही मिळावे यासाठी आमदार नवघरे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

यंदा पावसाअभावी शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. अशा परिस्थितीत पूर्णा प्रकल्पातून तीन पाणी आवर्तने मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

पहिले आवर्तन : १ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६

दुसरे आवर्तन : १ जानेवारी ते २० जानेवारी २०२७

तिसरे आवर्तन : १ मार्च ते २० मार्च २०२७

या नियोजनानुसार १२ दिवसांच्या रोटेशन पद्धतीने वसमत शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, हट्टा शाखा कालवा तसेच अंतिम शाखा कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कालव्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी पाणी आवर्तनाच्या नियोजित तारखा लक्षात घेऊन रब्बी पिकांचे नियोजन करावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आतापासूनच करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू नवघरे यांचा पाठपुरावा सुरू असून, चौथ्या आवर्तनाबाबतच्या निर्णयाकडे आता शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.

चौथ्या आवर्तनासाठीही पाठपुरावा

तीन आवर्तनांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला, तरी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता चौथे आवर्तन मिळणेही आवश्यक आहे. यासाठी आमदार राजू भैय्या नवघरे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांना पुरेसे पाणी मिळावे आणि रब्बी हंगामातील संभाव्य नुकसान टाळता यावे, हा या प्रयत्नांचा प्रमुख उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT