Basmath Soybean Husk Transport  Pudhari
हिंगोली

Hingoli Crime | वसमत तालुक्यात सोयाबीनचा भुसा वाहतूक करणाऱ्या दोन पिकअपवर कारवाई

दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना

पुढारी वृत्तसेवा

Basmath Soybean Husk Transport

वसमत: वसमत तालुक्यात सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना औद्योगिक वापराकरिता सोयाबीनचा भुसा वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर तहसीलदार सारंग चव्हाण व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. दोन्ही वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असताना सोयाबीनच्या भुशापासून गट्टू तयार करणाऱ्या कारखान्यांकडे भुसा नेला जात असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यानंतर तहसीलदार सारंग चव्हाण यांनी तत्काळ कारवाई करत भुसा वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांना रोखले.

या कारवाईदरम्यान महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या भुशाची वाहतूक आणि त्यावरील निर्बंधांबाबत दिलेल्या आदेशाची कीती आंमलबवजावणी होते याकडे शेतकरी व पशुपालकांचे लक्ष लागले आहे.

सध्याची चारा टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात निघणारे सोयाबीनचे भुसकट व अन्य भुसा जनावरांसाठी राखीव ठेवावे, जेणेकरून दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता होईल.
- सारंग चव्हाण, तहसीलदार, वसमत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT