Aundha Nagnath Wasamat road accident
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ येथे रस्ता पार करताना भरधाव दुचाकी स्वाराने एकास उडवले. ही घटना शुक्रवारी (दि. 28) घडली. या अपघातात दुचाकी चालकासह २ जण गंभीर जखमी झाले. तुकाराम वामन डोके (वय 35) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. तर पादचारी शेख खाजा शेख जानी (वय 50, रा. औंढा नागनाथ) यांना गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर जिंतूर टी पॉइंट येथे पायी रस्ता पार करणाऱ्या एकाला दुचाकी ( एम एच 38 एस झिरो एक 90) ने उडवले. त्यानंतर दुचाकीस्वारासह दोघेही गंभीर जखमी झाले. पायी चालणारा शेख खाजा शेख जानी यांना जास्त दुखापत झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. तर दुचाकी स्वार तुकाराम वामन डोके गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिले पथकासह तात्काळ दाखल झाले. तसेच राज्य महामार्गाचे खयामोद्दीन खतीब, कदम, थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ हिंगोली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.