औंढा नागनाथः औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे वाळकी येथे दिनांक 9/2/2025 रोजी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अल्पवयीन शिक्षण घेत असलेल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात जाऊन वाईट हेतूने मुलीचा हात धरून तसेच लज्जास्पद शब्द वापरून विनय भंग केला. विनयभंग करताना मज्जाव करत असलेल्या मुलीच्या दोन्ही आजींना मारहाण करून मुलीसह जिवे मारण्याची धमकी दिली असल्याच्या कारणावरून आरोपी संदीप भास्कर नांगरे राहणार वाळकी याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अफसर खान पठाण करीत आहे., तर
दुसरी घटना मौजे माथा येथील वय 33 वर्षीय महिलेच्या राहत्या घरात आरोपी रमेश रंगराव पोले याने अनधिकृत रित्या प्रवेश करून जबरदस्तीने वाईट उद्देशाने फिर्यादीचे हात धरून जवळ ओढले . फिर्यादीची सासू आरोपीस त्याच्यापासून सोडवत असताना त्या दोघींना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास जमादार संदीप टाक हे करीत आहेत.