Accident pudhari photo
हिंगोली

Aundha Nagnath Accident | फुलदाबा येथील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू

औंढा नागनाथ–पिंपळदरी रस्त्यावरील राजापूर गावाजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

Aundha Nagnath Phuldaba Youth Death

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाबा येथील मारुती आनंदराव मोघे (वय ३५) यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२५) घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मोघे हे कामानिमित्त दुचाकीवरून औंढा नागनाथकडे जात होते. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास औंढा नागनाथ–पिंपळदरी रस्त्यावरील राजापूर गावासमोरील ढेकळे यांच्या शेताजवळ त्यांची दुचाकी सिमेंट रस्त्यावर घसरून पडली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावरील कामासाठी वापरण्यात येणारे मालवाहू टिप्पर जवळून जात असताना उडालेल्या धुळीमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मयत मारुती मोघे यांचे शवविच्छेदन औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT