Hingoli News | औंढा नागनाथ बस स्थानकात खाजगी वाहनांचीच गर्दी! बसचालकांची होतेय तारेवरची कसरत 
हिंगोली

Hingoli News | औंढा नागनाथ बस स्थानकात खाजगी वाहनांचीच गर्दी! बसचालकांची होतेय तारेवरची कसरत

पुढारी वृत्तसेवा

औंढा नागनाथ :औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र आद्य आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर नागनाथाचे पवित्र स्थान असून या ठिकाणी नव्यानेच बस स्थानकाचे अद्यावत नूतनीकरण करण्यात आले असून बस स्थानक परिसरात मात्र खाजगी वाहन धारकांनी धुमाकूळ माजवला असल्याचे चित्र यामुळे याचा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासी भाविक भक्त आणि यात्रे करून ना त्रास सहन करावा लागत आहे.

सविस्तर असे की येथील बस स्थानकात बारा गाळे असून बस स्थानकाच्या मध्या वरती ठिकाणात शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आणि समोरच पोलीस मदत केंद्र व वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आली आहेत शौचालयाच्या वापरामुळे या गाळ्याच्या परिसरात तीव्र दुर्गंधी युक्त वातावरण निर्माण झाल्याने वाहतूक कक्ष पोलीस मुदत कक्ष आणि प्रवाशांना भयंकर त्रास होत आहे.

स्थानक परिसरात भव्य मोकळे पटांगण असल्याने खाजगी वाहन चालक व दुचाकी चालकआपली वाहने उभे करण्यासाठी याचा वापर करतात त्यामुळे असलेली प्रतिष्ठान आणि हॉटेल यांना या वाहनाचा त्रास सोसावा लागतो.

बस स्थानकाच्या समोरच 200 मीटर चे नो पार्किंगचे फलक लावलेले असूनही याकडे कोणतेही वाहन चालक लक्ष देईना. येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या 500 पेक्षा जास्त बस ये जा करतात खाजगी वाहनाच्या गर्दीमुळे बसचालकांना बस स्थानकामध्ये बस नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आणि खाजगी वाहनांना धक्का लागण्याची सुद्धा भीती तयार होते. परिणामी बस स्थानकाच्या परिसरात खाजगी वाहनाच्या उपस्थितीमुळे सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT