Hingoli Accident | भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू! 
हिंगोली

Hingoli Accident | भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू!

औंढा नागनाथ येथील बंदोबस्त आटोपून घरी परतत असताना हिवरा परिसरात भीषण अपघात ! तिन दिवसात हिंगोली पोलिस दलातील २ कर्मचाऱ्यांचा मृत्‍यू!

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी मुरलीधर जाधव यांचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 30 रोजी घडली. औंढां नागनाथ येथे मुरलीधर जाधव यांची बंदोबस्त कामी ड्युटी होती. दरम्यान ड्युटी नंतर ते मोटरसायकलने बासंबा येथे जात असताना हिवरा परिसरात भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर दुखापत होऊन त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे पोलीस निरीक्षक शेख,रविकांत हरकाळ यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत सदर जखमीला तातडीने हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मुरलीधर जाधव हे भिरडा तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली येथील रहिवासी होते. यापूर्वी त्यांनी सैन्य दलात ही कर्तव्य बजावले होते त्यांनी जम्मू, कश्मीर, पंजाब, व श्रीनगर अधि ठिकाणी कर्तव्य पार पाडले होते. 14 वर्षांपूर्वी त्यांची पोलीस दलात भरती झाली होती ते पोलीस दलात ही अत्यंत शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख होती. शिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल ही त्यांनी केली होत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं व दोन मुली असा परिवार असून सदर घटनेने हिंगोली पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान तीनच दिवसापूर्वी हिंगोली येथील मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान असलेले अमोल गगंलवाड यांनी रेल्वे समोर उडी घेऊन आपले जीवन संपवले. तर लगेच मुरलीधर जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हिंगोली पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT