Hingoli Accident | कळंबा पाटीजवळ भीषण अपघात 3 प्रवाशी ठार तर 5 गंभीर जखमी!  
हिंगोली

Hingoli Accident | कळंबा पाटीजवळ भीषण अपघात 3 प्रवाशी ठार तर 5 गंभीर जखमी!

भरधाव वाहनाची ऑटोला धडक , दोन बालकांचा मृतांमध्ये समावेश

पुढारी वृत्तसेवा

आडगाव रंजे ः औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर कळंबा पाटीजवळ भीषण अपघात झाला. एका भरधाव वाहनाने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील मयत व जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

औढा नागनाकडून काही प्रवासी एमएच-22-एपी-2149 या क्रमांकाच्या ॲटोने परभणीकडे निघाले होते. त्यांचा ॲटो औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर कळंबा पाटीजवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहने त्यांच्या ॲटोला धडक दिली. या अपघातानंतर ॲटो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ॲटो रस्त्याच्या खाली जाऊन उलटला.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन 108 रुग्णवाहिका बोलावली. या रुग्णवाहिकेद्वारे सहा जणांना उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले. मात्र त्यापैकी एका महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला तर पाच जखमींना उपचारासाठी परभणीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोन जखमी अत्यावस्थ असून इतर तीघे बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

या शिवाय घटनास्थळावर दोन बालकांचा मृ्‌‍त्यू झाला असून त्यापैकी तीन वर्षाची मुलगी व एक बारा वर्षाचा मुलगा आहे. दोघांचेही मृतदेह हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सिद्दीकी यांनी सांगितले. हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर, उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार हिरामण चव्हाण, कृष्णा चव्हाण यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची मयतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT