हिंगोली

हिंगोली : सेनगाव तालुक्यात १ लाखांची २९ किलो गांजाची झाडे जप्त

backup backup

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोळसा शिवारामध्ये हळदीच्या पिकामध्ये लावण्यात आलेली 1 लाख 45 हजार रुपये किमतीची 29 किलो गांजाची झाडे सेनगाव पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोळसा शिवारामधील शेतामध्ये हळदीच्या पिकात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगावचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख खुदूस, तुळशीराम वंजारे, संदीप पवार, तुकाराम मारकळ यांच्या पथकाने शनिवारी दुपारपासून परिसरात शोध मोहीम सुरू केली होती.

यामध्ये पोलिसांना जगन्नाथ वाव्हाळ यांच्या शेतातील हळदीच्या पिकात गांजाची झाडे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या ठिकाणी असलेली ३९ झाडे उपटून टाकली. या झाडांचे वजन 29 किलो भरले असून त्याची किंमत 1 लाख 45 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस यांच्या तक्रारीवरून सेनगांव पोलीस ठाण्यात जगन्नाथ वावळ याच्याविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भोईटे पुढील तपास करीत आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT