Hingoli news  
हिंगोली

Hingoli news | हट्टा येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

हट्टा : येथील फरीदा फरोज खा पठाण यांच्या घराला ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य जळून खाक झाले. ही घटना अचानक घडल्याने परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील विजेच्या शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. आगीने काही वेळातच मोठे रूप धारण केल्याने घरातील कपडे, भांडी, फर्निचर तसेच कपाट, कुलर कपडे अन्नधान्य आदी साहित्य पूर्णपणे जळून मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यामध्ये एकूण दोन लाख २३ हजार रुपयाचे नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी निर्मले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संबंधित प्रशासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT