हिंगोली

Hingoli news | प्रयत्नांना यश ! अखेर हट्टा येथे शिवस्मारकाची स्थापना

सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद भरून आला यावेळी ग्रामीण भागातून शेकडो शिवभक्त आले होते

पुढारी वृत्तसेवा

हट्टा : येथे शिवस्मारकाची स्थापना करण्याकरीता मागील काही दिवसापासून हालचाली जोमाने सुरू होत्या. गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवस्मारकाची स्थापना करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. पोलिसांनी शिवभक्तांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा विरोध झुगारून शिवस्मारकाची स्थापना करण्यात आली.

वसमत तालुक्यातील हट्टा येथे मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी पोलिस शिवस्मारकाची ठाण्यासमोर स्थापना करण्याकरीता मागील काही दिवसापासून हालचाली गतिमान झाल्या होत्या. त्या संदर्भात शिवस्मारका करीता ग्रामसभेचा ठरावही घेण्यात आला होता. शिवस्मारका करीता पुष्पक देशमुख यांनी १८ फेब्रुवारीला बी एस नल टॉवर जाऊन आंदोलन सुद्धा करावे लागले होते. त्यामुळे

शिवस्मारक उभारणी करत असताना शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या. गेल्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून रात्री ७ ते आठच्या च्या सुमारास अचानक मोठ्या संख्येने शिवभक्त शिवस्मारकाच्या नियोजित स्थळी जमा झाले. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या जायघोशांत घोषणा देत शिवस्मारकाची स्थापना करण्यात आली. व सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद भरून आला यावेळी ग्रामीण भागातून शेकडो शिवभक्त आले होते. या प्रसंगी पुष्पक देशमुख यांनी शिवाजी महाराज पुतळ्याचे पुजन केले. यावेळी हट्टा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवप्रेमी आपल्या मागणीवर ठाम होते. यावेळी पोउपनि गवळी, ताम्रध्वज कासले, शेख हकीम, इंगोले यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT