हिंगोली

३९ कोटींच्या निधीतून हळदवाडी साठवण तलावाचे काम

२९८ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली, आ. मुटकुळेंनी केली कामाची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : तालुक्यातील हळदवाडी येथे ३९ कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या साठवण तलावाच्या प्रगतिपथावर असलेले हे काम आता पूर्णत्वाकडे जात असून, यामुळे परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या तलावामुळे २९८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शनिवारी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी या कामाची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.

या तलावामुळे हळदवाडी आणि परिसरातील गावांच्या भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार असून तलावाचे काम आता पूर्णत्वाकडे आले असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. या साठवण तलावामुळे परिसरातील एकूण २९८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

या प्रकल्पामुळे हळदवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे आ. मुटकुळे यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यात के. के. शिंदे, संतोष टेकाळे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, हिंगोली ग्रामीण मंडळ अध्यक्ष माणिक लोडे, सहायक अभियंता प्राजक्ता भुजाडले, स्थापत्य सहायक शुभम भोपळे, स्थापत्य सहायक तेजल भुसाटे, कंत्राटदार आसाराम घुगे, सरपंच शंकर शिंदे, प्रल्हाद शिंदे, रुस्तुम शिंदे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT