हिंगोली

हिंगोली : भाटेगाव येथे टेम्पोच्या अपघातात आठ वर्षांची मुलगी जागी ठार

backup backup

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील आज (दि. ५) सकाळी सहा वाजता टेम्पोच्या धडघ अपघात झाला. या अपघातामध्ये चिमुकली जागीच ठार झाले.

राष्ट्रीय महामार्ग 361 वरील भाटेगाव येथे गावाला गत हा अपघात झाला असून या अपघातातील टेम्पो क्रमांक MH 26 BE73 98 हा नागपूर येथून संत्रा घेऊन आंध्र प्रदेशात जात असतानाच भाटेगाव जवळ अपघात झाला. या अपघातामध्ये टेम्पोचे चालक यांनी अपघात टाळण्याकरता शर्तीचे प्रयत्न केले पण त्या चिमुकल्या मुलीला वाचविण्यासाठी त्यांनी टेम्पोला जाग्यावर थांबण्यासाठी प्रयत्न केले व यामध्ये टेम्पो हा जाग्यावरच पलटी झाला व चिमुकल्या मुलींना टेम्पोचा धक्का लागून चिमुकली जाग्यावर ठार झाले अशी माहिती ग्रामस्थां कडून समजली आहे या अपघाताची माहिती कळताच आखाडाबाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळू चोपडे व डोंगरकडा पोलीस बीट जमादार नागोराव बाभळे यांनी धाव घेऊन जमावाला शांत केले व पुढील शवइच्छेदनासाठी डोंगरकडा आरोग्य केंद्राकडे पाठवून दिली यावेळी डॉ, विनोद अतकुरकर यांनी पुढील तपासण्या केल्या या घटनेमुळे भाटेगाव गावा मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

नागपूर नांदेड महामार्गावरील भाटेगाव हे गाव रस्त्यालगतच आहे या ठिकाणी साईट रस्ता देणे गरजेचा होता पण महामार्ग प्राधिकरण विभागांनी या ठिकाणी साईट रस्ता दिला नाही यामुळे या गावालगत नेहमीच अपघाताची मालिका सुरूच असते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT