Hingoli News : उपोषणकर्त्यांना मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा file photo
हिंगोली

Hingoli News : उपोषणकर्त्यांना मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा

या प्रकरणी चौघांवर बुधवारी रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Case registered against four individuals for assaulting hunger strikers

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील केसापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी कामाच्या योजनेच्या पुरवठा चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणकर्त्यास मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांवर बुधवारी रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील केसापूर येथे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. या कामांवर तब्बल दिड कोटी रुपयांचा खर्च झाला असला तरी पोलीस ठाणे हिंगोली (शहर) प्रत्यक्षात गावात पाणीच आले नाही. कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही पाणी नसल्याने गावकऱ्यांनी या कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या मागणीसाठी गावकरी गजानन शिंदे, दत्ता शिंदे, विजय भोरगे, विजय बनसोडे, समाधान बनसोडे, मारोती पवार यांच्यासह गावकऱ्यांनी २८ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत या कामाची चौकशी होत नाही तसेच गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भुमीका उपोषणकर्त्यांनी घेतली.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी गावातील रमेश शिंदे, राजेश शिंदे, सुरेश शिंदे, विलास शिंदे यांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन गजानन शिंदे यास तु आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवागीळ करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तेथे असलेल्या काही गावकऱ्यांनी सोडवा सोडव केली. या प्रकरणी गजानन शिंदे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वरील चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, पोटे, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT