हिंगोली

Hingoli Bribery case : कुरुंद्यात वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला ४ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मोहन कारंडे

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोलार पंपाच्या सर्वेक्षणासाठी (Saur Krushi Pump Yojana) ४ हजाराची लाच घेताना वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला बुधवारी (दि.३) सायंकाळी रंगेहाथ पकडले. लक्ष्मीकांत बिजलगावे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका शेतकऱ्याला शेतात सोलारपंपाची उभारणी करायची होती. त्यासाठी त्याने वीज कंपनीकडे रितसर अर्ज सादर केला आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणासाठी त्यांनी विज कंपनीचे कर्मचारी लक्ष्मीकांत बिजलवार याच्याकडे पाठपुरावा सुरु केला होता. मात्र लक्ष्मीकांत याने त्यासाठी सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ४ हजार रुपये देण्याचे ठरले होते. सदर रक्कम बुधवारी कुरुंदा येथे देण्याचेही ठरले होते.

मात्र संबधित शेतकऱ्याने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. यावरून उपाधिक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर, जमादार ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, रवी वर्णे, राजाराम फुफाटे,

Mahavitaran

शेख अकबर यांच्या पथकाने कुरुंदा येथील टी पॉईंटवर सापळा रचला होता. ठरल्या प्रमाणे लक्ष्मीकांत याने शेतकऱ्याकडून चार हजार रुपयाची लाच घेतली. यावेळी लाचलुचपतच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT