आमदार मुटकुळे  Pudhari Photo
हिंगोली

प्रकृती खालावल्याने भाजप आमदार मुटकुळे यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले

मुंबईतील रुग्णालयात मुटकुळे यांच्यावर उपचार सुरु

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : भाजपचे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आमदार मुटकुळे यांना नांदेड विमानतळावरून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत नेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. मात्र गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आमदार मुटकुळे यांना नांदेड विमानतळावरून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत नेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT