Banjara community march in Hingoli, thousands of community members participate
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा राज्यातील बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी शासनाच्या विर ोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शासनाने हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली. आंध्रप्रदेशातील बंजारा समाजाला एसटी संवर्गात आरक्षण असून आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील बंजारा समाजातील रितीरिवाज, बोलीभाषा एकच आहे.
मात्र राज्यात बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण देण्यात आलेले नाही. शासनाने आता हैदराबाद गॅझेटीयर लागू करण्याचा आदेश काढला असून त्यानुसार बंजारा समाजाला एसटी संवर्गात आरक्षण देणे अपेक्षीत आहे. मात्र शासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही.
त्यामुळे राज्यात बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हयातील सकल बंजारा समाजाच्या वतीने येथील जिल्हा परिषद मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येथील जिल्हा परिषद मैदानावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आ लेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घो-षणाबाजी केली.
यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जो पर्यंत बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण दिले जात नाही तो पर्यंत तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अॅड. पंजाब चव्हाण, हिंमतराव राठोड, भागोराव राठोड, संतोष राठोड, उत्तमराव राठोड, नारायण बाबा राठोड, एस. पी. राठोड, रमेश जाधव, लखुसिंग राठोड यांच्यासह हजारो नागरीकांची उपस्थिती होती. आंदोलनात महिलांची लक्षणिय उपस्थिती होती.