pudhari photo
हिंगोली

बाळासाहेब ठाकरे हळद केंद्राला ७ कोटी ८४ लाखांचा निधी

Hingoli News | निधी वितरीत केल्याने जिल्ह्यातील हळद संशोधनाला गती प्राप्त होणार

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अंमलबजावणीसाठी सन २०२४-२५ करिता आज ७ कोटी ८४ लक्ष ८० हजार रुपयांचा निधी आज वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील हळद संशोधनाला गती प्राप्त होणार आहे. परिणामी येथील हळद उत्पादक शेतक-यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

जिल्ह्यामध्ये 'मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रांला 14 सप्टेंबर, 2022 रोजीच्या मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी जुलै ऑगस्टमध्ये 2024 रोजीच्या शासन निणर्यान्वये निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच, दि. 16 सप्टेंबर, 20024 व दि. 23 जानेवारी, 2025 रोजीच्या शासन निर्णयांन्वये योजनेसाठी सन 2024-25 करीता निधी वितरीत करण्यात आला आहे.

तसेच आता या योजनेकरिता आज गुरुवार, दि. 27 मार्च, 2025 च्या शासन निर्णयानुसार या केंद्राकरीता यंदा हा निधी लेखाशीर्षांतर्गत चालू वर्षी अर्थसंकल्पित केलेल्या तरतूदीतून खर्च करण्यात येणार आहे. ही योजना राबविताना शासन निर्णयातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी. वितरीत निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. तसेच सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तीकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित अटी व शर्तीचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही शासन निर्णयात दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT