औंढा नागनाथ : येथील मानाच्या बारा गणपती चे विसर्जन भव्य मिरवणुकीने शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरून शांततेत झाले. अतिसंवेदनशील असलेल्या या ठिकाणी चोख बंदोबस्त आणि विसर्जन मिरवणूक प्रक्रिया शांततेत चालू असताना एका तरुणाला आपला प्राण गमवावा लागल्यामुळे श्री विसर्जन मिरवणुकीला मात्र गाल बोट लागले .
तालुक्यातील गाव, वाड्या तांडे ,शहरांमधून श्री विसर्जन सर्वत्र शांततेत पार पडल्याचे सांगण्यात आले. खेड्यापाड्यातून सुद्धा डीजेचा विसर्जन मिरवणुकी सर्रास वापर झालेला दिसून आला. शहरातील मुख्य श्री 12 गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शांतता समिती मध्ये गुलाला ऐवजी फुलाची उधळण आणि डीजे किंबहुना डॉल्बी मुक्त विसर्जन मिरवणूक करण्याचे पोलीस यंत्रणेचे आवाहन पोकळ ठरले असून डीजेचा कर्ण कर्कश आवाज मिरवणुकीमध्ये लक्ष वेधून घेत होता.
सोबत विद्युत तीक्ष्ण लाईटची किरणे डोळे, मेंदू, शरीर आणि कानावर किती परिणाम करतील हे सांगणे सध्या तरी अवघड आहे. कुंभकर्ण टाकळी ता.जि.परभणी येथील तरुण औंढा नागनाथ येथे कापड व्यापार करून उदरनिर्वाहासाठी आला होता. नागेश काशीराम वाघमारे वय21 वर्ष रा. टाकळी कुंभकर्ण हा मिरवणुक पाहण्यासाठी सोनार गल्लीमध्ये थांबला होता , यास त्या ठिकाणी चक्कर येऊन जागीच मृत्यू झाली.
औंढा नागनाथ पोलिसात मयताचा भाऊ कृष्णा काशिनाथ वाघमारे वय 23 वर्ष रा .टाकळी कुंभकर्ण याने माहिती दिल्यावरून मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून डॉल्बीच्या अति कर्कश आवाजाने किंवा इतर कारणाने मृत्यू झाला हे शवाविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर निश्चित होईल.
डॉल्बी चालक व वाहनांवर गुन्हे
औंढा नागनाथ पोलीस स्थानकामध्ये एकूण दहा ते बारा डॉल्बीवादक व वाहन चालकां विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आली असून वाहनासह डॉल्बी किंबहुना डीजे सह पोलीस स्थानकाच्या प्रांगणामध्ये वाहने लावली होती. श्री विसर्जन मिरवणुकीदरम्यान औंढा नागनाथ पोलीसांकडून विशेष व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पो. नि. श्याम कुमार डोंगरे, पो.उ.नि. अमोल इंगोले, शेख सय्यद अयुब,शेख खुदुस भाई , रविकांत हरकळ , श्रीधर वाघमारे, अमोल चव्हाण, आदीसह पोलिस अधिकारी कर्मचारी व गृह रक्षक दलाचे जवान यांनी श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली.
2010 च्या श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधवांच्या धार्मिक स्थळाजवळ गुलाल व रंग फेकण्यावरून दगडफेक झाल्यामुळे गालबोट लागले होते, त्यानंतर तब्बल 16 वर्षाच्या प्रदीर्घ खंडानंतर श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे पुन्हा गालबोट लागले आहे.