१० वर्षांनंतर हिंगोलीत घुमणार हॉकीचा आवाज file photo
हिंगोली

Hingoli News : १० वर्षांनंतर हिंगोलीत घुमणार हॉकीचा आवाज

ऑल इंडिया स्पर्धेचा उद्यापासून थरार; देशभरातील ४० संघ आमनेसामने

पुढारी वृत्तसेवा

After 10 years, the sound of hockey will resonate in Hingoli

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा;

गेल्या १० वर्षांपासून हिंगोलीत शांत अस-लेला हॉकीचा स्टिकचा आवाज आता पुन्हा एकदा घुमणार आहे. हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशनच्या पुढाकाराने आणि राज्य हॉकी असोसिएशनच्या मान्यतेने शहरात ऑल इंडिया हॉकी टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, रविवारपासून (दि. ८) सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी जुन्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली असून, देशभरातील तब्बल ४० संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

स्व. उपायुक्त दयानंद श्रीलेले यांच्या स्मरणार्थ आयोजित स्वर्ण चषक ऑल इंडिया टुर्नामेंटचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. ८) दुपारी १२:३० वाजता जुन्या जिल्हा परिषद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, नगराध्यक्षा रेखा बांगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी मुंबई पोलीस, नागपूर सिटी पोलीस, ब्रह्मपुरी, खालसा नांदेड, परभणी, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि अमरावती यांसारखे नामांकित संघ हिंगोलीत दाखल होत आहेत. ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान हा क्रीडा थरार रंगणार आहे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश श्रीलेले, सचिव प्रकाश वाघमारे, अयुब पठाण, केशव दुवे, कल्याण देशमुख, गोविंद निलजेवार, शैलेश मुदिराज, ओम दुबे यांच्यासह संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे.

या कार्यक्रमाला माजी आमदार गजानन घुगे, गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष माबुद बागवान, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, आरटीओ राहुल गावंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुनील देवडा, रामचंद्र कयाल, सुभाषचंद्र तापडिया, कमलकिशोर काबरा, बाबा नाईक, गजेंद्र बियाणी, राजेश जयस्वाल, शरद जयस्वाल, ललितराज खुराणा, प्राचार्य डॉ. विलास आघाव, जगजितराज खुराणा, राजू शिंदे, भाटीया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हॉकीप्रेमींसाठी मोठी पर्वणी

दहा वर्षांच्या मोठ्या खंडानंतर हिंगोलीत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धा होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पाहण्याची आणि शिकण्याची संधी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT