रोहित्र वाटपात मोठा गैरव्यवहार; महावितरण पडले तोंडघशी  file photo
हिंगोली

रोहित्र वाटपात मोठा गैरव्यवहार; महावितरण पडले तोंडघशी

रोहित्र वाटपात मोठा गैरव्यवहार; महावितरण पडले तोंडघशी

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली, पुढारी वृतसेवा: जिल्ह्यात रोहित्र वाटपात मोठा गैरव्यवहार झाला असून काही रोहित्र परस्परच सेवकन्यांना विक्री करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात बोज कंपनीकडे गुरुवारी निवेदन सादर केले असून नेमके कुठल्या रोहित्रात गैरव्यवहार झाला याची यादीन प्रशासनाकडे सादर केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात वीज कंपनीचा कारभार मागील काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. शेती पंपाना योग्य दाबाने वीजपुरवठा द्यावा, वीज वाहिन्या, किटकैट दुरुस्ती करावी यासह इतर मागण्यांसाठी डॉ. रमेश शिंदे हे मागील चार दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाची विज कंपनीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.

त्यानंतर गुरुवारी डॉ. शिंदे यांच्यासह डॉ. प्रल्हाद शिंदे, दावीवा पाटील, दिलीग थोरात, विश्वनाथ फाळके, राजेश टेकाळे, राजाराम शिंदे, कैलास टेकाळे, सखाराम शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी चीज कंपनीकड़े निवेदन दिले आहे. पामध्ये हिंगोली जिल्ह्यात पुसेगाव, डोंगरकडा, येळी, नहीं, नागारिंगी, गिरगाव, जलालदाना, महागाव देवकरवाडी, कनका, निर्वा, मसोड संतुकपिंपरी, पुरजळ, शिर्डी, बागमत पार्टी, कजादेव, आडगावक, वसमत, आरळ, कपडा, उडी, नवलगव्हाण, बेलबुरा, दांडगान, साखरा, भगवती या ठिकाणी प्रत्यक्षात ६३ केव्हीए क्षमतेचे रोहित्र दुरुस्तीसाठी आणण्यात आल्यानंतर सर्वच ठिकाणी नार्थिक व्यवहार करून वाढीव क्षमतेचे रोहित्र दिली,

तर काही रोहित्र परस्पर शेतकऱ्यांना विक्री केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. याशिवाय वीज कंपनीकडून दरवर्षी वीज वाहिन्या, किटकैट यासह इतर साहित्याची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना मागील तीन ते चार वर्षापासून दुरुस्तीच करण्यात आली नाही. तर दुरुस्तीची देयके उचलले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आरती आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित शेतक-यांनी दिलेले निवेदन अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत आले नाही. मात्र त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता आर. एम. बव्हाण यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT