मराठवाडा

हिंगोली : मावशीला सोडण्यासाठी निघाला अन् उचलले टोकाचे पाऊल…

backup backup

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी शिवारात कालव्याच्या पुलावर दुचाकी उभी करून तरुणाने मावशीच्या समोरच कालव्याच्या पाण्यात उडी घेतली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सूरज उत्तम माने (वय २५, रा. कान्हेगाव) असे उडी घेतलेल्या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस व गावकऱ्यांनी त्याचा कालव्याच्या पाण्यात शोध सुरु केला आहे.

सूरज माने हा सोमवारी (दि. २६) सकाळी कान्हेगाव (ता. कळमनुरी) येथून दुचाकीवर त्याच्या मावशीला आखाडा बाळापूर येथे सोडण्यासाठी निघाला होता. त्याची दुचाकी कान्हेगावपासून काही अंतरावर असलेल्या पिंपरी शिवारात आली असताना सूरजने अचानक कालव्याच्या पुलावर दुचाकी थांबवली. यावेळी त्याच्या मावशीने दुचाकी का थांबविली? अशी विचारणा केली. मात्र, सूरजने काहीही न बोलता कालव्याकडे धाव घेतली. त्यामुळे घाबरलेल्या मावशीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मावशीच्या हाताला झटका देऊन कालव्यात उडी मारली.सध्या कालव्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे पाहता पाहता तो कालव्यातील पाण्याच्याप्रवाहासोबत तो वाहून गेला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मावशीने तातडीने कान्हेगाव येथे माहिती दिली तसेच मदतीसाठी आरडा ओरड केली. त्यामुळे पिंपरीचे गावकरी व कान्हेगाव येथील गावकरी घटनास्थळी धावले. तर पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार नागोराव बाभळे, विट्ठल जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी बेपत्ता सूरजचा शोध सुरु केला आहे.दरम्यान, तरुणाने कालव्यात उडी का घेतली? हे अद्याप समजू शकलेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT