हिंगोली, गजानन लोंढे : शाश्वत पाण्याची हमी नसतानाही वसमत तालुक्यातील मरसुळ येथील ग्रामस्थांनी एकीच्या बळावर शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ मिळवत जिल्ह्यातील शंभर टक्के सुक्ष्म सिंचनावर पिके घेणारे गाव म्हणून मरसुळ हे पहिले गाव ठरले आहे. इतर शेतकर्यांसाठी मरसुळ येथील शेतकर्यांचा हा प्रयोग रोल मॉडेल ठरतो आहे. अवघ्या दोन वर्षात संपूर्ण गाव ओलिताखाली आले असून उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
आदिवासी बहुल मरसुळ ची भौगोलिक स्थिती पाहिली तर हा भाग डोंगराळ येथील बहुतांश शेतजमीन कोरडवाहू त्यामुळे चांगला पाऊस झाला तरच पीकही चांगले होत होते. गावात केवळ 10 टक्के शेतकर्याकडे सिंचन होते. 510 हेक्टर पेरणी क्षेत्र आता ओलीताखाली आले आहे.कृषी विभाग, तालुका, कृषी विभाग यांच्या प्रयत्नातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत या गावाची निवड झाली त्यातून ग्रामस्थांनी उपलब्ध पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले. त्याचे फलित म्हणजे उत्पन्न देखील 30 ते 40 टक्के वाढले आहे.
ठिबक सिंचनाचा फायदा लक्षात आल्याने गावातील हळद, भाजीपाला आणी फळबाग पिकावरील क्षेत्र हे शंभर टक्के सिंचनाखाली आले. याचा सोयाबीन पिकाला देखील फायदा झाला आता उन्हाळी भुईमूग घेण्याची तयारी येथील शेतकर्यांनी केली आहे. ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे पारंपरिक सिंचनाच्या तुलनेत 50 ते 70 टक्के पाण्याची बचत पिकाची एकसमान उगवण व समान वाट,तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, मजूरही कमी लागतात तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.विजेची बचत होते, खतांची कार्यक्षमता वाढते. उत्पादनात वाढ होते पिकाची प्रतही सुधारण्यास मदत होते.
गावात कोणताही गट तट न ठेवता प्रत्येकाला नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे आम्ही लक्ष दिले. शेतकर्यांनी देखील केवळ अनुदान मिळावे हा हेतू न ठेवता योजनेतून गावाला कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. अशी प्रतिक्रिया सरपंच संजय व्हडगीर यांनी दिली.
प्रत्येकाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी लाभ कसा मिळेल याकडे लक्ष दिले. शेतकर्यांनाही केवळ अनुदान मिळावे हा हेतू याकडे लक्ष दिले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. जिल्हा कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक मनोज लोखंडे यांनी बांधावर जाऊन घोंगडी बैठका, आठवडे योजनेचा बैठक, ग्रामसभेत वेळी मार्गदर्शन केले. सोशल मिळेल, याकडे आम्ही विशेष मीडियाचाही प्रभावी वापर केला. त्यातून गावात ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापरगाव शंभा टक्के ओलिताखाली आले.