मराठवाडा

हिंगोली : जवळा बुद्रुक शिवारातून सव्वा लाखाचा गांजा जप्त

मोहन कारंडे

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील एका शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सव्वा लाख रुपये किमतीचा 11 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एका व्यक्तीवर हट्टा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

जवळा बुद्रुक शिवारात गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार संभाजी लेकुळे, गजानन पोकळे, भगवान आडे, सुनील अंभोरे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी शिवारामध्ये पाहणी केली. यामध्ये रामराव राजगुरे यांच्या शेतामध्ये गांजाची झाडे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजाची 32 झाडे जप्त केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीनवार यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी पोलिस उपाधीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बोराटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक बोराटे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT