मराठवाडा

हिंगोली : वसमत बाजार समितीच्या निवडणुकीत राडा

backup backup

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत बाजार समितीच्या निवडणूक मतदानावेळी भाजपचे उमेदवार खोब्राजी नरवाडे यांच्या कालशिलात लगावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. यानंतर पोलीस ठाण्यातून जमावाने काढता पाय घेतल्याने मोठा वाद टळला. रविवारी (दि.२५) मतदानाच्या वेळी हा प्रकार घडला आहे.

वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या १८ जागेसाठी ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये चार अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांचा पॅनल तर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांचा एकत्रीत पॅनल असे दोन पॅनल समोरासमोर निवडणूक रिंगणात आहेत.

रविवारी सकाळपासूनच मतदानाला सुरवात झाली. दुपारी संचालकपदासाठी निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष खोब्राजी नरवाडे मतदान केंद्रात जात असताना तेथे उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी खोब्राजी नरवाडे यांच्या कानशिलात लगावली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजपचे नेते आणि पदाधिकारी शेकडो कार्य़कर्त्यांसह मतदानानंतर थेट पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपनिरीक्षक खार्डे यांच्या विरुध्द तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.जो पर्यंत कारवाई होत नाही, तो पर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना वसमत येथे रवाना केले. पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर जमाव पोलीस ठाण्याबाहेर पडला.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT