मराठवाडा

हिंगोली : दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली; १७ दुचाकी जप्त

backup backup

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीसह इतर जिल्ह्यात दुचाकीची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. या कारवाईत त्यांच्याकडून एकूण १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे दुचाकी मालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांना दिल्या होत्या. दरम्यान, नर्सी ना. पोलीस ठाण्यात २९ मे रोजी दुचाकी चोरीसंदर्भात एक गुन्हा नोंद झाला होता. यामध्ये योगेश तान्हाजी शिंदे (रा. सिद्धेश्वर), दशरथ लालसिंग पवार (रा. पेडगाव) यांचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी नर्सी ना, वसमत ग्रामीण, सातारा (जि. छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाणे हद्दीतूनही दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६ लाख रूपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या. कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड येथील गजानन कामाजी पवार यांच्याकडूनही पोलिसांनी ५ लाख ७० हजार रूपये किमतीच्या ८ दुचाकी जप्त केल्या.

ही कारावाई पोलीस अधीक्षक श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलीस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, भगवान आडे, गजानन पोकळे, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, नरेंद्र वाळवे, प्रशात वाघमारे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT