मराठवाड्यात पुन्हा भर'पूर' File Photo
मराठवाडा

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात पुन्हा भर'पूर'

आधीच मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार उडविला आहे. त्यातून सावरत नाही तोच दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा १४१ मंडळात अतिवृष्टी झाली.

पुढारी वृत्तसेवा

Heavy rains in Marathwada, many villages under water, rivers flooded

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आधीच मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार उडविला आहे. त्यातून सावरत नाही तोच दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांवर पावसाने कहर केला. विभागातील १४१ मंडळात अतिवृष्टी झाली. पुन्हा झालेल्या भरपूर पावसाने या सहाही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परत एकदा अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.

उरलं सुरलं पिकही शनिवारच्या पावसाने जमीनदोस्त झाले आहे. या पावसामुळे नांदेड-हैदराबाद मार्ग बंद पडला आहे. तर हिमायनगर तालुक्यात वीज कोसळून गाय गंभीर तर वासराचा जागीच मृत्यू झाला आहे. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून पांडुरंग निवृत्ती कदम (वय ४७) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मन्याड व विष्णुपुरी धरणातून झालेला विसर्ग आणि २६ च्या रात्री व २७ सप्टेंबरला झालेला मुसळधार पाऊस यामुळे गोदावरी, मन्याड नदीने रौद्र रूप धारण केले. उदगीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे १३ गावांचा तुटला संपर्क !

बीड : केज तालुक्यातील मांजरा नदीला पूर माजलगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे खरिप पिके उद्धवस्त. धारूर तालुक्यात तब्बल १००० मि.मी. पावसाची नोंद. अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे एका घराची भिंत कोसळून दोघेजण जखमी. माजलगाव धरण, मांजरा धरण, बिंदुसरा व सिंदफणा प्रकल्प शंभर टक्के भरले असून दरवाजे उघडण्यात आले आहेत.

लातूर : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी व वाढवणा येथील सर्वात मोठे तलाव असलेले तिरू मध्यम प्रकल्प प्रचंड पावसामुळे पूर्ण भरले. या तलावाच्या सांडव्यावरून पाच ते सहा फूट उंचीवरून पाणी वाहत आहे. अतिवृष्टीमुळे १३ गावांचा तुटला संपर्क ! शिरूर अनंतपाळ तालुक्यात महापुराचा कहर, नदी-नाले ओसंडले. शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर.

हिंगोली : ३० पैकी १९ मंडळांत अतिवृष्टी; पांगरा शिंदे गावालगत अस लेला चोर तलाव ओसंडून वाहून लागला असून मागील १६ वर्षांत प्रथमच हा तलाव भरला. सर्वात जास्त पाऊस वसमत, कळमनुरी, हिंगोली तालुक्यांत, पुसद-हिंगोली मार्गावरील वाहतूक बंद

नांदेड : खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, लोहा, कंधार, हिमायनगर तालुक्यात सर्वाधिक फटका. कंधार तालुक्यातील फुलवळ, कंधारेवाडी, मुंडेवाडी, वाखरड, सोमासवाडी, आंबुलगा, पानशेवडी परिसरात ४ ते ५ दिवसांपासून जोरदार पाऊस, पिकांचे मोठं नुकसान, मन्याड नदीला पूर आल्याने मुखेड-नरसी, नायगावचा संपर्क तुटला. नायगाव तालुक्यातील अनेक गावे जलमय. हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून गाय गंभीर तर वासराचा जागीच मृत्यू, कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून पांडुरंग निवृत्ती कदम (वय ४७) या शेतकऱ्याचा मृत्यू.

परभणी : २१ मंडळांत अतिवृष्टीची नोंदः परभणी जिल्ह्यासह शहरात पावसाने मागील १२ तासांपासून रिपरिप. शनिवार भरणारा आठवडे बाजार पावसामुळे भरण्यात आला नाही. गंगाखेड-पालम, गंगाखेड-राणीसावरगाव हा रस्ता वाहतुकीसाठी बंद, पालम, गंगाखेड तालुक्यात अतिवृष्टी, गंगाखेड तालुक्यातील जवळा येथील हनुमान मंदिरावर वीज कोसळून शिखराचे मोठे नुकसान.

धाराशिव: परंडा व भूम तालुक्यात नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सीना, मांजरा, खैरी, तेरणा अशा जिल्ह्यातील बहतांश सर्वच नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक कोलमडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT