मराठवाडा

परभणी : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

Shambhuraj Pachindre

मानवत; पुढारी वृत्तसेवा : जुलै व ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. काहींची असून पिके वाहून गेली तर काही शेतकऱ्यांची पिके पिवळी पडून सडून गेली. पावसाने शेतजमीन खरडून गेल्यानेही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. या निवेदनावर शेतकरी संघटनेचे भास्कर निर्मळ, नारायण आवचार, त्रिंम्बक सुरवसे, मोहन माणोलीकर, ज्ञानेश्वर निर्वळ. हनुमान तारे, मतीन अन्सारी, रमेश साठे, बालासाहेब निर्वळ, मच्छिंद्र निर्मळ, सुभाष निर्मळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT