मराठवाडा

Facebook Account Hack : गंगापूर तहसीलदारांचे फेसबुक अकाउंट हॅक; अज्ञात व्यक्तीकडून पैशाची मागणी

backup backup

गंगापूर; पुढारी वृत्तसेवा : गंगापूरचे तहसीलदार यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. तहसीलदार सतीश सोनी या बनावट फेसबुक खात्यात्याद्वारे पैशाची मागणी होत असल्याने खळबळ उडाली आहे.

गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांच्या अधिकृत फेसबूक अकाउंटचे बनावट खाते तयार करण्यात आले आहे. या फेसबुक खात्यावर सोनी यांचे फोटो टाकुन संबंधित व्यक्ती फेसबुकवरील मित्रांकडून पैशाची मागणी करत आहे.  जवळपास चारशे नागरिक, अधिकारी यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. पैशाची आवश्यकता आहे अशा आशयाचे मेसेज मेसेंजरद्वारे अज्ञात व्यक्ती पाठवत आहे.

हसीलदार सतीश सोनी यांनी व्हिडिओद्वारे सतर्क राहण्याचे आवाहन

एखाद्या व्यक्ती ऑनलाईन पैश्याची मागणी करत असेल तर मुळीच पैश्याचा व्यवहार करू नये. तसेच संबंधित बनावट अकाऊंटची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. या बनावट खात्यावरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन मित्र यादीतील लोकांना पैसे मागवण्याचा गोरखधंदा हॅकरणे चालू केला आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करावी असे आवाहन तहसिलदारांकडून करण्यात आले आहे.  तसेच संबंधित अकाउंट बनावट असून ब्लॉक करून मेसेज आल्यास नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करावे. सोनी यांचे वैयक्तिक फेसबुक अकाउंट बंद करण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तहसीलदार सतीश सोनी यांनी व्हिडिओद्वारे या प्रकरणाची माहिती देत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी अज्ञात हॅकर विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT