Accused arrested for wife murder over character suspicion 
धाराशिव

Dharashiv- चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; फरार आरोपी ताब्यात

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; फरार आरोपी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

कळंब - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश ऊर्फ विनायक शिवाजी टेकाळे याला कळंब पोलिसांनी अटक केली आहे. पिंपळगाव (डोळा) शिवारातील शेतातील गोठ्यातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 ऑक्टोबर २०२७ रोजी दुपारी 2.0 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान हसेगाव शिवारातील मानधने पेट्रोल पंपासमोरील शेतात कोमल गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे यांच्यावर आरोपी पती गणेश टेकाळे याने चारित्र्याच्या संशयावरून चैन व दगडाने डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी बंडू विश्वंभर पवार (रा. करंजकल्ला, ता. कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 434/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध सुरू होता. मात्र, आरोपी वारंवार वास्तव्य बदलत असल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगांव (डोळा) शिवारातील शेतातील गोठ्यातून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर तसेच पोलीस अंमलदार अनिल भोसले, किरण माळी, औदुंबर गजबार व सुनील तारळकर यांच्या पथकाने केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT