robbery case Pudhari
धाराशिव

परंड्यात चाकूने वार करीत शेतकऱ्याच्या घरावर दरोडा

Dharashiv News | नळदुर्ग येथून आठ लाख रुपयांच्या साहित्याची चोरी

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : जिल्ह्यात दरोडा व चोरीच्या घटनांत वाढ होत असून परंडा, मुरुम आणि नळदुर्ग पोलीस ठाण्यांत वेगवेगळ्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंड्यात दरोडेखोराने चाकूने वार करीत दोन तोळ्यांचे गंठण पळविले असून नळदुर्ग येथे आठ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.

परंडा तालुक्यातील कुंभेजा येथे दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या पाच अज्ञात इसमांनी वृद्ध दांपत्यावर हल्ला करून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली. फिर्यादी लता विश्वनाथ जगताप (वय ६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ एप्रिलच्या मध्यरात्री घरासमोर झोपलेल्या असताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे गंठण जबरदस्तीने हिसकावले. तसेच त्यांच्या पतीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले.

या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नळदुर्ग येथे अस्फान गारमेंटस या दुकानात चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करत वायरचे बंडल, मशीन, मोटारी व इतर साहित्य असा एकूण ८ लाख २९ हजार ८०० रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

केसरजवळग्यात मंदिराचे कुलूप तोडून चोरी

दरम्यान, मुरुम तालुक्यातील केसरजवळगा येथे दुर्गा देवी व लालसाब देवी मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सुमारे ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २३ ते २४ एप्रिलदरम्यान घडली असून मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT