Umarga Sub District Hospital pudhari photo
धाराशिव

Dharashiv healthcare : उमरगा उपजिल्हा रुग्णालयात मोर्च्युरी कॅबिनेट अखेर उपलब्ध

उमरगा : दै. पुढारीच्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल, नागरिकांची हेळसांड थांबणार

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : उपजिल्हा रुग्णालयातील शीतगृह (फ्रीजर) दीड वर्षापासून बंद असल्याचे सर्व प्रथम वृत्त दै. पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने या वृत्ताची तातडीने दखल घेतली आहे. प्रशासनाकडून दोन मृतदेह ठेवण्याची क्षमता असलेले मोर्च्युरी कॅबिनेट (शवागारातील शीतकपाट) उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे मृतदेह सुरक्षित ठेवण्याची मोठी अडचण दूर झाली आहे.

पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा हे राज्याच्या सीमेवर आहे. महामार्ग व ईतर अपघातातील जखमींवर वेळत उपचार व्हावे म्हणून सर्व सुविधा युक्त शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर आहे. तालुक्यासह परराज्यातील हजारो रुग्णावर उपचार तसेच वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येते.

एखाद्या घटनेतील अनोळखी मृतदेहाची ओळख पटेपर्यत मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयात शवागृह आहे. मात्र दीड वर्षापासून येथील शीतगृह बंद मृतदेह ठेवण्यासाठी प्रशासनाला खासगी फ्रिजरची व्यवस्था करावी लागत होती. यामुळे मृतदेहाच्या सन्मानाचा प्रश्नही निर्माण झाला होता. शितगृहामुळे मृतदेहाची होणारी विटंबना या गंभीर बाबीकडे पुढारी ने ‘उपजिल्हा रुग्णालयातील फ्रीजर दीड वर्षांपासून बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

यात प्रशासनासह सर्वपक्षीय नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याची बाब पुढारी ने परखडपणे मांडली होती, या वृत्तानंतर अँड शितल चव्हाण फाउंडेशन व उमेश राजेनिंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. गेल्या आठवड्यात प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत दोन मृतदेह क्षमतेचे मोर्च्युरी कॅबिनेट उपलब्ध करून दिले. त्यामुळे आता मृतदेह जतन करण्यासाठी खासगी फ्रिजरवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.

दरम्यान, सुविधांबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. पुढारीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे स्वागत होत आहे. मृत्यूनंतरही प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळावा, यासाठी अशा मूलभूत सुविधा कार्यरत राहणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील शीतगृहाच्या प्रश्नाची वरिष्ठांनी तातडीने दखल घेत गेल्याच आठवड्यात एक मोर्च्युरी कॅबिनेट उपलब्ध झाले आहे. यात दोन मृतदेह ठेवण्याची क्षमता असून मोर्च्युरी कॅबिनेट कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे मृतदेह सुरक्षित ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे‌, रुग्णालयातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ कोमल गरड, वैद्यकीय अधीक्षक, उमरगा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT