धाराशिव

Drought Relief Fund : दुष्काळग्रस्तांसाठी तुळजापूर देवस्थानचे मुख्यमंत्री सहायता निधीस तीन कोटी

दुष्काळामुळे राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला तीन कोटी रुपये दिले. त्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी सुपूर्द केला. याप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, मंदिराच्या तहसीलदार माया माने, तहसीलदार अरविंद बोळंगे उपस्थित होते.

दुष्काळामुळे राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार असून, ग्रामीण भागात पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला तीन कोटी रुपयांची मदत दिली.

यापूर्वी देवस्थानने दिलेली मदत

कोल्हापूर-सांगली परिसरात महापुराच्या काळात पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच महिलांना साड्यांचे वाटप केले

पुणे शहरातील महापुराच्या काळातही संस्थानच्या वतीने मदतकार्य केले

सन २०१९ मध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला

२५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली

सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT