Tulja Bhavani Temple 
धाराशिव

Tulja Bhavani Temple : मटका किंगला थेट गर्भगृहात प्रवेश दिल्याप्रकरणी व्यवस्थापक निलंबित

तुळजापुरात सामान्य भाविक आणि पुजाऱ्यांनी तक्रार करताच जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : सोलापूरच्या एका तडीपार ‘मटका किंग’ला थेट देवीच्या गर्भगृहात व्हीआयपी प्रवेश देत मातेचे दर्शन दिल्याप्रकरणी पुजारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ऐन शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये हा प्रकार घडल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या मटका किंगला भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहायक सुजित जमदाडे यांच्या मध्यस्थीने गाभाऱ्यात प्रवेश दिला गेल्याचे बोलले जात आहे. सामान्य भक्तांच्या श्रद्धा आणि भक्तीचे पावित्र्य ज्या मंदिराशी जोडले गेले आहे. त्या मंदिराला स्वतःचा राजकीय धंदा बनविणाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. मटका किंग अरुण रोडगे हा बुधवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येथे आला होता, अशी माहिती मिळत आहे.

आचारसंहिता लागू, तरीही प्रवेश दिलाच कसा?

सध्या पदवीधर मतदारसंघांच्‍या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने मंदिर संस्थानने मातेच्या नवरात्र महोत्सवापूर्वी व्हीआयपी पास बंद केल्याचे जाहीर केले होते, तरीही एका तडीपार, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला थेट देवीच्या गर्भगृहात प्रवेश दिलाच कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT