तुळजापरात दर्शन रांगेत भाविकाकडे आढळले पिस्तूल 
धाराशिव

Tulja Bhavani Temple : तुळजापरात दर्शन रांगेत भाविकाकडे आढळले पिस्तूल

मंदिर परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात सोमवारी अभिषेक दर्शनाच्या रांगेत एका भाविकाकडे पिस्तूल आढळल्याने मंदिर परिसरात खळबळ उडाली. या प्रकारामुळे मंदिरातील प्रवेश तपासणी आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित भाविकाकडे पिस्तूल बाळगण्याचा वैध परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रविवारी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास बिडकर तलावाकडून अभिषेक दर्शनाच्या रांगेतून येणारा एक भाविक पास तपासणीच्या ठिकाणाजवळ पोहोचला. त्यावेळी त्याच्या कमरेला पिस्तूल असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. सुरक्षा रक्षकाने तत्काळ संबंधित भाविकाकडे विचारणा केली. त्यावेळी आपल्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकांनी मंदिर प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित भाविकाला पिस्तूल बाजूला ठेवण्यास सांगण्यात आले. मंदिर पोलीस चौकी पोलिसांनी पिस्तूल आणि परवान्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भाविकाकडे पिस्तूल बाळगण्याचा वैध परवाना होता. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भाविकाला सोडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT