जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे बासे  Pudhari Photo
धाराशिव

तुळजाभवानी मंदिराच्या जिर्णोद्धार कामाला प्रारंभ

Restoration of Tuljabhavani Temple | अध्यक्ष ओंबासे : तीन टप्प्यात होणार विकास कामे

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी मुंबई आणि लातूर येथील अधिकृत एजन्सी काम करणार आहेत. पुरातत्त्व खात्याच्या निर्देशानुसार हे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

जिल्हाधिकारी ओंबासे यांनी यावेळी सांगितले, की हा मंदिर परिसराचा विकास मंदिर संस्थांच्या छप्पन कोटी निधीमधून करण्यात येत आहे. कामाचे एकूण सहा टप्पे बनविण्यात आले आहेत. सहानी कन्स्ट्रक्शन मुंबई व साई कन्स्ट्रक्शन लातूर या दोन कंपनीकडून हे काम केले जात आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे निविदा प्रसिद्ध करून कामकाज करण्यासाठी आदेश पारित केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये दर्शनासाठी जाणारे भुयारी मार्ग आणि सभामंडप यांचे जतन आणि संवर्धन करणे त्याचबरोबर नूतनीकरण करणे दुसरा टप्पा मध्ये मंदिरातील उपदेवतांची मंदिरे यांच्या जतन संवर्धन व विकास केला जाईल. यामध्ये खंडोबा मंदिर, मातंगी मंदिर, टोळभैरव मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, मार्तंड ऋषी मंदिर, यमाई मंदिर या मंदिराचा समावेश करण्यात आलेला आहे.

तिसऱ्या टप्प्यामध्ये स्टेडियमच्या पायऱ्या तसेच गोमुक्तीर्थ जवळ असणारे पूर्वीचे आराध्य खोल्या व जुने प्रशासकीय कार्यालय या परिसराचा विकास करण्यासाठी इमारती काढून टाकून तेथे बाहेर पडण्याचा मार्ग विकसित करणे. मंदिर परिसरामध्ये असलेले अनावश्यक बांधकाम काढून टाकणे ज्याच्यासाठी पुरातत्त्व खात्याने परवानगी दिलेली आहे, दगडावर केमिकल प्रक्रिया करून त्याची झीज होणार नाही यासाठी काम करणे जुन्या दगडावरील लेप काढून ते नवीन घडविल्यासारखे बनविणे, चौथ्या टप्प्यामध्ये अभिषेक मंडपाचे नूतनीकरण करण्यात येईल. याला जोडून असणारा तुकोजी महाराज यांचा मठ हा देखील विकसित होईल हा परिसर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये समाविष्ट केला जाईल अभिषेक पूजेच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा बदल केला जात आहे.

दक्षिण उत्तर दिशेला मंदिराचा विकास होणार असून दर्शन मंडपाच्या दोन्ही दिशेच्या बाजूने जुन्या ओव्या विकसित केल्या जातील. मंदिराच्या अखेरच्या सीमारेषेवर या ओवऱ्या असतील. वृध्द, अपंग भाविकांसाठी मंदिरामध्ये लिफ्ट नसल्यामुळे या विकास आराखड्यामध्ये लिफ्टचा समावेश केलेला आहे. तुकोजी महाराज मठापासून दोन लिफ्ट चालतील व तिसरी लिफ्ट नवीन महाद्वाराच्या जवळ असेल त्याचा मार्ग स्वतंत्र आहे,

नव्याने बदल होणारे या कामकाजाची माहिती महंत आणि पुजारी यांना देण्यात आली आहे. सर्वांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन केले जात आहे सर्वात अगोदर उपदेवतांच्या मंदिराचे जतन संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुख्य दोन दरवाजे आणि पलंगा शेजारी असणारा एक दरवाजा सुरुवातीला केल्यास इतर काम करण्यासाठी मदत मिळू शकते. मार्च अखेरीस हे दोन प्रवेशद्वाराचे काम पूर्ण होईल अशा सूचना आपण दिलेल्या आहेत. गाभार्‍यासमोर असणारे झरोका खिडकी येथे जो दरवाजा निघणार आहे त्यामुळे अभिषेकासाठी मोठी सोय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT