Tuljabhavani Navratra : दुसऱ्या माळेला तुळजाभवानी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, हजारो भाविकांचे दर्शन 
धाराशिव

Tuljabhavani Navratra : दुसऱ्या माळेला तुळजाभवानी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, हजारो भाविकांचे दर्शन

मंदिर संस्थांनच्यावतीने अपघातग्रस्तांसाठी ‘मदत ॲप’

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरामध्ये साडेतीन शक्तीपीठ महात्म्य फुलांच्या सजावटीने मांडण्यात आले आहे. हजारो भाविक भक्तांनी फुलांनी सजवलेल्या मंदिर परिसराचे कौतुक केले.

नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या माळेच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर यामध्ये राजे शहाजी महाद्वार राजे जिजाऊ महाद्वार, राजेशिवाजी महाराज, पिंपळाचा पार, गणेश विहार, निंबाळकर दरवाजा अशा वेगवेगळ्या ठिकाणी कोल्हापूरच्या अंबाबाई, वनी चे सप्तशृंगी देवी, माहूरची रेणुका माता व तुळजापूरची अंबाबाई या साडेतीन शक्तीपीठाच्या देवीच्या मुखवट्याची फुलांनी सजावट केली आहे याशिवाय भारतीय संस्कृतीमधील शुभ चिन्हांचे देखील रेखाटन फुलांच्या या सजावटीमध्ये केलेले आहे. याशिवाय मंदिराच्या सर्व परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मंदिर संस्थांनच्यावतीने अपघातग्रस्तांसाठी ‘गुड समॅरिटन ॲप’

ठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गरजे लक्षात घेऊन म्हणजे संस्थांच्या वतीने अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘गुड समॅरिटन’ ॲपचा वापर करावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मदत करणाऱ्या नागरिकाला ‘गुड समॅरिटन’ असे म्हणतात. अपघातानंतर जखमी व्यक्तीला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अपघातानंतरचा पहिला तास हा ‘गोल्डन अवर’ म्हणून ओळखला जातो. या कालावधीत योग्य वैद्यकीय मदत मिळाल्यास जखमी व्यक्तीचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते.

‘गुड समॅरिटन’ ॲपच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांनुसार अपघाताची माहिती देणे, छायाचित्रे अपलोड करणे तसेच संबंधित यंत्रणांशी संपर्क साधणे शक्य होऊ शकते. भाविकांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक असलेल्या परवानग्या, लोकेशन सेटिंग्ज आणि संपर्क सुविधांची तपासणी करून घ्यावी. ॲपचा वापर करताना त्यामधील सूचनांचे पालन करावे असे आवाहन मंदिर संस्थांनच्या वतीने करण्यात आलीे आहे.

अपघात किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवेसाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. अपघातग्रस्तांना मदत करताना स्वतःची सुरक्षितता जपावी आणि जखमी व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT