धाराशिव

तुळजाभवानी मातेची रथालंकार महापूजा

दिनेश चोरगे

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवातील चौथ्या माळेला, बुधवारी रथालंकार महापूजा बांधण्यात आली. सात अश्वांच्या रथात आरूढ मातेच्या मुख्य मूर्तीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मातेचे मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडण्यात येत असून, 1 ते 6 या वेळेत भाविक मुख व धर्म दर्शन योजनेचा लाभ घेत आहेत.

मातेच्या मुख्य मूर्तीला दिवसभरात सकाळ-संध्याकाळी सात ते आठ तास सार्वजनिक पंचामृत अभिषेक घालण्यात येत आहे. मूर्तीच्या डोक्यावरून केवळ छत्रपतींच्या घराण्याचा मानाचा दुग्धाभिषेक घातला जातो. इतर सर्व अभिषेक मातेच्या पायावर घालण्यात येतात. मातेच्या अभिषेक, सिंहासन महापूजेमुळे सध्या दूध-दही, श्रीखंडाची विक्री वाढली असून, भावही वधारले आहेत.

SCROLL FOR NEXT