तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवात मंगळवारी (दि. ८) सहाव्या माळेच्या दिवशी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. देवीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.
पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील पूजा मांडण्यात आली आहे. उद्या (दि. ९) शेषेशाही अलंकार महापूजा, १० ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.
सोमवारी रात्री १० वाजता पाचव्या माळेच्या दिवशी श्री देवीजींची छबिना मिरवणूक नंदी वाहनांवरुन काढण्यात आली.