मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाने ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ दिले FILE PHOTO
धाराशिव

मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाने ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ दिले

सहकारमंत्री पाटील यांचे प्रतिपादन : ११ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

The Marathwada Rural Literature Conference provided a platform for rural writers.

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. स्व. वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थनि चालवला जात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नानासाहेब पाटील यांनी केले.

शिक्षणमहर्षी वसंतराव काले प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या वतीने आयोजित ११ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उदघाटन रविचारी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, आ. संजय बनसोडे, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ.म. शहाजिंदे, स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, प्राचार्य अनिल काळे, सौ. अनुराधा काळे, सौ. शुभांगी काळे, व्यंकट बेद्रे, कुलगुरू मधुकरराव गायकवाड, अंकुश नाडे, प्राचार्य हरिदास फेरे, बालाजी तांबे, गंगाधर आरडले, बाबासाहेब भिसे, राजकुमार मंदेकर, राजकुमार जाधव.. आनंद जाधव, बंटी मयिंग, युवराज शिंदे, डी. एन. केंद्रे विपुल काळे, रणवीर काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिक्षणमहर्षी स्व. वसंतराव काळे व स्थ. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले.

चंद्रकांत बिराजदार, हेमंत जाधव, दत्तात्रय पवार, रमेश विराजदार, बी. एन. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिक्षणमहर्षी स्व. वसंतराव काळे व स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले. मंत्री पाटील म्हणाले, मराठी साहित्याला मोठी परंपरा आहे. संत साहित्याचा वारसा जपण्याचे कार्य मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी होत आहे, डी अभिमानास्पद बाब आहे.

भालचंद्र नेमाडे, शरणकुमार लिंबाळे, ना. धो. महानोर यांच्या सारख्या लेखकांनी मराठी साहित्याला उंची दिली. मराठी भाषेतील अभंग, भारुड या कला प्रकारांनी समाज जागृतीचे काम केले. हाच मराठी साहित्याचा जागर या संमेलनात होत असल्याचेही ते म्हणाले. स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे यांनी, संमेलन आयोजनामागील उद्देश स्पष्ट करून ग्रामीण मराठी साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात, संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत म्हणालो की, बॅरिस्टर सावरकर यांनी १९३८ साली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून मातृभाषा हीच ज्ञान भाषा झाली पाहिजे असा आग्रह धरला होता. तरीसुद्धा अजुन त्यांचे स्वप्न साकार झाले नाही. मायमराठीची उपेक्षा आणि दरवस्था अजुन थांबलेली नाही. आम्ही कोणत्याही भाषेचे विर-रोधक नाहीत किंवा कोणत्याही एका भाषेसाठी दुराग्रही नाही. पण मराठीची अवहेलना होऊ नये, असे मनापासून वाटते. प्रयत्न केले तर आपली मायमराठी फक्त नावापुरती नव्हे तर खरीखुरी राजभाषा बनू शकते.

उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन किरण कोरे यांनी तर आभारप्रदर्शन बालाजी इतबारे यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत लिखित अनुभवाचे बोल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास मराठवाडयातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथदिंडीने दुमदुमली साहित्यनगरी

साहित्य संमेलनात सकाळी गावातून भव्यदिव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीचे उदघाटन बार्शीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या हस्ते झाले. ग्रंथदिंडीत पाराशिव, लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी लेझीम, डोल-ताशाच्या निनादात सहभाग घेतला. पौराणिक, ऐतिहासिक आणि विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडीतील विद्याथ्यांच्या उत्स्फुर्ततले शिक्षणमहर्षि वसंतराव काळे साहित्यनगरी दुमदुमून गेली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT