Omraje Nimbalkar file photo
धाराशिव

OmRaje Nimbalkar |: मंत्रीपदासाठी नाही, केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी निर्णय

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचे पुन्हा स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

The decision was made solely for the district's development, not for a ministerial post

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय हा केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी घेतला असून, मंत्रीपदाची कोणतीही अपेक्षा नसल्याचे स्पष्टीकरण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पुन्हा एकदा दिले.

शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रविवारी (दि. २८) त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले, की माझ्या जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि शिवसैनिकांचा राग मी समजू शकतो. मात्र, त्यांच्या रागावर काळ हेच उत्तर असेल. मी मंत्रीपदासाठी नाही, तर जिल्ह्याच्या विकासकामांसाठी पक्षांतर केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिला.

त्यामुळे मलाही हा निर्णय घ्यावा लागला. उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर टीका केली तरी मी त्यांच्याविषयी कोणतेही वक्तव्य करणार नाही, असेही श्री. राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर ट्रोल

दरम्यान, पक्षांतरानंतर सोशल मीडियावर शिवसेनेचे कार्यकर्ते खा. ओमराजेंना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत असून, त्यांच्या निर्णयावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना, या सर्व टीकेला काळच उत्तर देईल, असा विश्वास खा. राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT