Sina Kolegaon Dam Water Storage pudhari photo
धाराशिव

Dharashiv Water Crisis : सिना धरणात उरला केवळ १.४० टीएमसी पाणीसाठा

शेतीचे पाणी दोन दिवसांत बंद होण्‍याचे संकेत; वीज जोडणी तोडणार

पुढारी वृत्तसेवा

परंडा : धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या सिना कोळेगाव (कल्याण सागर) प्रकल्पातील पाणीसाठा यंदा मोठ्या प्रमाणात घटला आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या नोंदीनुसार धरणात केवळ ३९.६३६ दशलक्ष घनमीटर म्हणजे १.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत १५०.४९० दशलक्ष घनमीटर म्हणजे ५.३१ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ३.९१ टीएमसी म्हणजेच ७४ टक्के पाणीसाठा कमी आहे.

धरणातील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने परंड्याचे तहसीलदार निलेश काकडे यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी उपलब्ध पाणीसाठ्यासह शेतीसाठी सुरू असलेल्या पाणी उपशाचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतीसाठी सुरू असलेला पाणी उपसा दोन दिवसांत बंद करावा, असे आवाहन त्यांनी केले. अन्यथा वीज जोडणी तोडून कारवाई करण्याचा इशारा दिला.

सिना कोळेगाव जलाशयातून परंडा शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने घटलेल्या पाणीसाठ्यामुळे आगामी काळातील पाणी नियोजनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याचे पाणी आणि शेती यासाठी उपलब्ध साठ्याचा काटेकोर वापर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

दरम्यान, डोमगाव परिसरातील शेतकरी प्रशांत खैरे यांनी ऊस काही दिवसांत तोडणीला येणार असल्याने धरणावरील विद्युत पंपांची जोडणी आणखी दहा दिवस तोडू नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

७४ टक्क्यांची झाली घट

गतवर्षी १०० टक्के असलेला साठा (५.३१ टीएमसी) यंदा मोठ्या प्रमाणात घटला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३.९१ टीएमसी पाणी कमी झाले असून, साठ्यात सुमारे ७४ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT