Sexual assault; Threat to make video viral
उमरगा, पुढारी वृत्तसेवा : एका २३ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक संबंधाचे व्हिडिओ करून व्हायरल करण्याची धमकीही तो सातत्याने देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा धक्कादायक प्रकार उमरगा तालुक्यात घडला आहे. १८ डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, एका तरुणाने तिच्या मुलीला लग्नाचे वचन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या दरम्यान, आरोपीने या कृत्याचे मोबाइलवर छायाचित्रण केले आणि ते प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपी व पीडितेच्या नाव पोलिसांनी गोपनीय ठेवले आहे.