Remove 'GR' and postpone Diwali: MP Omprakash Rajenimbalkar
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी होऊ देणार नाही, असे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारची मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने दिवाळीच पुढे ढकलता येते का पहा, असा उपरोधिक टोला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लगावला.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भूम, परंडा तालुक्यात सर्वत्र पुराने हाहाकार माजवला होता. तर जिल्ह्याच्या उर्वरीत सहा तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी दिलासा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा होईल.
त्यांची दिवाळी अंधारात साजरी होणार नाही, असे सांगितले होते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम आली असली तरी अतिशय कमी आहे. अनेक बँकांनी ती रक्कम होल्ड केली आहे. त्यामुळे सरकारला त्यांचे आश्वासन पाळायचे असेल तर दिवाळीच जीआर काढून पुढे ढकलता येते का पहा, असा टोला माध्यमांशी बोलताना लगावला.