शहर विकासाचा आ. पाटील यांचा अजेंडा भक्कम करणार : विनोद गंगणे File Photo
धाराशिव

शहर विकासाचा आ. पाटील यांचा अजेंडा भक्कम करणार : विनोद गंगणे

नगराध्यक्षपदाचा आज स्वीकारणार पदभार

पुढारी वृत्तसेवा

MLA Patil's agenda for urban development will be strengthened: Vinod Gangane

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या वतीने तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी १,८६५ कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा यशस्-वीपणे राबवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिली आहे. सोमवारी (दि. २९) श्री. गंगणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

सोमवारी सकाळी ११ वाजता महंत तुकोजी महाराज व महंत वाकोजी महाराज यांच्या उपस्थितीत श्री. गंगणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पदग्रहणापूर्वी त्यांनी विकासा बाबतची भूमिका स्पष्ट केली. या वेळी सचिन रोचकरी, सज्जन साळुंके, पंडीत जगदाळे, आनंद कंदले, नरेश अमृतराव आदी उपस्थित होते.

तुळजापूर तीर्थक्षेत्र व तुळजाभवानी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास हा काळाची गरज असून, वाढती भाविक संख्या लक्षात घेता नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवताना पुजारी बांधव, व्यापारी, जागा मालक तसेच स्थानिक नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील.

सर्वांच्या सहमतीने आराखड्याला अंतिम स्वरूप देऊन राज्य शासनाच्या १,८६५ कोटी रुपयांच्या निधीचा योग्य वापर केला जाईल, असेही नगराध्यक्ष गंगणे यांनी स्पष्ट केले. भाविकांसाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक, निवास आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद विशेष प्रयत्न करणार आहे. तुळजापूर शहराचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी आमदार व राज्य सरकारचे सहकार्य घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

शहराच्या विकासासाठी सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात, मात्र त्याशिवाय विकास शक्य नाही, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, नागरिकांनी आपल्या प्रभागातील समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात, त्या सोडवण्यासाठी नगरपरिषद वचनबद्ध राहील, असे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी नमूद केले.

अपेक्षा, तक्रारी लिखित स्वरूपात द्या आपण नगराध्यक्ष पदाचा पदभार घेत असताना तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, की आपल्या प्रभागांमध्ये आपणास ज्या सुविधा गरजेचे आहेत याविषयी आपण निःसंकोचपणे लेखी स्वरूपात आमच्याकडे निवेदन द्यावे. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकास कामासाठी राजकारण केले जाणार नाही.
- विनोद गंगणे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष तुळजापूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT