नळदुर्गमध्ये जुना महामार्ग सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन file photo
धाराशिव

Dharashiv News : नळदुर्गमध्ये जुना महामार्ग सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन

नळदुर्ग शहरातून जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी नळदुर्ग बसस्थानकासमोरील संविधान चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Maha Vikas Aghadi Stages 'Rasta Roko' Protest in Naldurg to Reopen Old Highway

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : नळदुर्ग शहरातून जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी नळदुर्ग बसस्थानकासमोरील संविधान चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे जळकोट, अणदूर आणि अक्कलकोटकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते प्रशांत नवगिरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर टीका करत, नळदुर्ग शहराला जोडणारा जुना महामार्ग तातडीने सुरू करावा, अशी मागणी केली.

बाह्यवळण रस्ता झाल्यानंतर मुर्दा पाटी ते खंडोबा पानन दरम्यानचा जुना मार्ग बंद करण्यात आल्याने शहराच्या बाजारपेठेवर परिणाम होत असून व्यापारी, प्रवासी, ऑटोचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. खाजगी ट्रॅव्हल्स शहरात न येता थेट बाह्यवळण मार्गाने जात असल्याने नळदुर्गच्या व्यापारी व्यवहारांवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जुना महामार्ग त्वरित सुरू न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, शेतकरी संघटनेचे प्रदीप जोशी, नगरसेवक मारुती खारवे, इमाम शेख, संतोष पुदाले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर मागण्यांचे निवेदन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT