HSRP Plates : एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी वाहनचालकांचा संथ प्रतिसाद  (File Photo)
धाराशिव

HSRP Plates : एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी वाहनचालकांचा संथ प्रतिसाद

अर्ज केलेल्या ५३ हजारांपैकी २१ हजार वाहनांना प्लेट

पुढारी वृत्तसेवा

Low response from people to install HSRP plates

विकास उबाळे

कसबे तडवळे : केंद्र सरकारने २०१९ पूर्वीच्या वाहनांना 'उच्च सुरक्षा क्रमांक पाटी' (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यामध्ये या मोहिमेला वाहनचालकांकडून अत्यंत संथ प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याची एकूण वाहनसंख्या सुमारे २ लाख ६७हजार असून, त्यापैकी केवळ २० टक्के वाहनचालकांनीच आतापर्यंत 'एचए सआरपी' प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत.

'एचएसआरपी' प्लेट लावण्याची मोहीम १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. वाहनधारकांच्या उदासीन प्रतिसादामुळे परिवहन विभागाने यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. आज, १५ ऑगस्ट रोजी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. तरीही सुमारे ८० टक्के वाहनधारकांनी याकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान दुपारी येथील आरटीओ कार्यालयास नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदत वाढीचे परिवहन आयुक्तांचे पात्र प्राप्त झाले.

मागील सात महिन्यांमध्ये जिल्ह्यात केवळ १५ टक्के वाहनांना 'एचएसआरपी' प्लेट बसवण्यात आल्या आहेत. अर्ज केलेल्या ५३,०७० वाहनांपैकी ३१,२१३ वाहनांनाच प्लेट बसवण्यात आल्या आहेत, तर २१,८५७ वाहनांना प्लेट बसवणे बाकी आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी ११ आणि १२ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत 'फिटमेंट सेंटर' वाढवणे, वाहनचालकांच्या अडचणी दूर करणे आणि जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT