Dharashiv News : अटीतटीच्या लढतीत गंगणे यांनी भेदले चक्रव्यूह File Photo
धाराशिव

Dharashiv News : अटीतटीच्या लढतीत गंगणे यांनी भेदले चक्रव्यूह

भाजपचा १८, तर काग्रेसचा ५ जागांवर विजय

पुढारी वृत्तसेवा

In a closely contested fight, Vinod Gangane of the BJP emerged victorious.

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा :

अतिशय अटीतटीच्या लढतीत भापजच्या विनोद गंगणे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचा पराभव करीत पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळविले. भाजपाचे १८ उमेदवार व काँग्रेसचे ५ जण विजयी ठरले.

निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये पंडित जगदाळे विजयी ( १४३२), पराभूत अर्जुन भोजने ( ३६८) सौ मंजुषा देशमाने विजयी ( १३४१), सौ जयश्री साबळे ( ४२५), भाग २ मधील विजय कदम औदुंबर पंडितराव (१११८), पराभूत जीवन उपेंद्र कदम (६१७), नीता दिनेश क्षीरसागर विजयी (१११२), पराभूत कोमल आनंद रोचकरी (६२७), प्रभाग क्रमांक ३ मधील पेंदे लखन भालचंद्र विजयी (१३२५) तट बालाजी रावसाहेब (८३६), १८८६ मताने विजयी, प्रभाग ४ विजयी रोचकरी सुनील संभाजी (१६०६), कदम सोनजी विनोद (५७९), श्वेता वैभव साळुंखे विजयी (१२८२) अमृता सुदर्शन वाघमारे (७६४), प्रभाग पाच मधून विजयी महानंताबाई किशोर साठे (११८३), चव्हाण भाग्यश्री प्रमोद (११५२)

भोसले चंद्रशेखर बाळासाहेब विजयी ( १७४८) चोपदार राकेश राजेंद्र (९२२), प्रभाग ६ मधून विजयी सागर विलास कदम (१२२१) कदम सुभाष मारुती (५६२), सरोजा नरेश अमृतराव विजयी (११७९) अरुणा गोरक्षनाथ पवार (५६४), प्रभाग ७ मधून विजयी प्रगती गोपाळ लोंढे (११२९), अमृता दादासाहेब खपले (१०४२), जाधव अमरीश अशोकराव (९३७) रणजीत चंद्रकांत इंगळे विजयी (१२४५), प्रभाग क्रमांक ८ मध्ये विजयी सावंत ज्योती आनंद (११२६) विजयी, पांडागळे रेखा श्रीकांत (१०७४), अक्षय धनंजय कदम विजयी (१३२९), संतोष देविदास कदम (१०३९), प्रभाग क्रमांक ९ विजयी अमोल माधवराव कुतवळ (१३३०), अण्णाप्पा नामदेव पवार (६७४), जयश्री विजयकुमार कंदले विजयी (१३३०)

मोनिका श्रीकांत रसाळ (९०९), प्रभाग क्रमांक १० मध्ये विजयी आनंद नानासाहेब जगताप विजयी (९५६), रोचकरी सचिन ज्ञानोबा (५७८) प्रियंका विजय गंगणे विजयी (७७९), धरती चिन्मय मगर (७४१), प्रभाग ११ अश्विनी विशाल रोचकरी विजयी (२००७), बडोदकर संगीता शहाजी (६३९), प्रिया मनोज मलकुनाईक विजयी (१८५७) प्रमोदिनी प्रशांत अपराधी (६९०), रामचंद्र सुखदेव रोचकरी (२१२४), विजय राहुल विनोद खपले (५०२) हे विजयी झाले. नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने बाजी मारली. ड्रग्ज प्रकरण या निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गाजविले होते मात्र मतदारांनी या निवडणुकीत आपला भारतीय जनता पार्टीच्या बाजूने दिल्यामुळे विनोद गंगणे यांचे शहरातील स्थान अधोरेखित झाले आहे.

जगानाळे पाचव्यांदा विजयी

तुळजापूर खुर्द या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक पंडित जगदाळे यांचा पाचव्यांदा विजय झाला. माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी आणि संतोष परमेश्वर कदम यांचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. काँग्रेसचे रणजीत इंगळे व आनंद जगताप हे सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे चांगल्या मतांनी निवडून आले. यापूर्वी अजित परमेश्वर यांच्या मुलगी डॉ. कदम हिचा बिनविरोध विजय झालेला आहे. विनोद गंगणे यांना या निवडणुकीत सर्व बाजूंनी घेतले गेले होते खासदार आणि स्थानिक सर्व विरोधकांनी हल्ला करूनही त्यांनी आपला विजय संपादित केला आहे.

तुळजापूरच्या मतदारांनी दडपशाहीला नव्हे तर अत्यंत विश्वासाने मला मतदान केले आहे भारतीय जनता पार्टी आणि आ. राणाजगजीत सिंह पाटील यांच्यावरील विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचे काम जलद गतीने करणे आणि लोकांचे प्रश्न सोडवून विकासकामांना प्राधान्य देणे भाविकांच्या सुविधा वाढविणे यासाठी आपला प्रयत्न असेल असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT