नागपूर : आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आयआयएमच्या प्रमुखांसोबत बैठक घेत चर्चा केली.  pudhari photo
धाराशिव

Nagpur IIM consultancy projects : जागतिक दर्जाच्या प्रकल्पांसाठी नागपूर आयआयएमचे मार्गदर्शन

आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठकीनंतर दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकणारे परिवर्तनकारी प्रकल्प अधिक वेगाने व जागतिक दर्जाने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी व्यवस्थापन क्षेत्रात जगविख्यात असलेल्या नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम)चे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्क तसेच 1000 एकरवरील तारा प्रकल्प या तीन महत्त्वाकांक्षी उपक्रमांना मोठे सहकार्य लाभणार असल्याची माहिती ‌‘मित्र‌’चे उपाध्यक्ष तथा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

धाराशिव जिल्ह्याचे अर्थकारण सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. या उपक्रमांच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत जागतिक दर्जा, व्यावसायिक दृष्टिकोन, शाश्वत विकास आणि दीर्घकालीन आर्थिक परिणामांचा सखोल अभ्यास करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे. यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागपूर आयआयएमला भेट देऊन संस्थेच्या तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली.

या चर्चेत तुळजापूर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास, भाविकांसाठी मूलभूत व पर्यटन पायाभूत सुविधा, स्थानिक व्यवसायांना संधी, तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्कमुळे निर्माण होणारे औद्योगिक वातावरण व रोजगारनिर्मिती यावर भर देण्यात आला.

नागपूर आयआयएमच्या तज्ज्ञांची टीम येत्या जानेवारीत धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार असून प्रशासन, लोकप्रतिनिधी व संबंधित घटकांसोबत संयुक्त बैठक घेऊन प्रकल्पांच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, आर्थिक व्यवहार्यता, गुंतवणूक आकर्षण व सार्वजनिक-खाजगी भागीदारीबाबत मार्गदर्शन करणार आहे. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन सर्वांगीण व शाश्वत विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT