Himalayan International Yoga Award to Bhadanta Dr Upagupta Mahathero
उमरगा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा येथील अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांना हिमालयीन आतंरराष्ट्रीय योगा अवॉर्ड २०२५ हा पुरस्कार नुकताच लेहलडाख येथे बिहारचें राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते जागतिक योगा दिवसाचे औचित्त्य साधून प्रदान करण्यात आला.
असोसिएशनचे चेअरमन श्रींग डोरजे लकरुक, भारत सरकार आयुष्य मंत्रालयांचे मंत्री डॉ राघवेंद्र रॉय, भिक्खू संघसेना महाथेरो, पंजाब चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सत्यनामसिंग संधू, उप कुलगुरू प्रोफेसर पुष्पा, नेपाळ भारताचे राजदूत डॉ शंकर प्रसाद शर्मा, आदींची उपस्थिती होती.
यावेळी भदन्त डॉ उपगुप्त महाथेरो यांनी राज्यपाल यांच्याशी बुद्ध गया मुक्तीसंदर्भात चर्चा केली. जगात भारताची ओळख बौद्धांचा देश म्हणून केली जाते. बुद्ध गया येथूनच बौद्ध धम्माचा जगभर प्रचार झाला. बौद्ध सम्राट राजा अशोकाने विहाराचा जीर्णोद्धार केल्याने जगभरातील बौद्ध पर्यटक मोठ्या श्रद्धेने महाबोधी विहाराकडे ऊर्जास्रोत म्हणून पहातात.
जंबुदिपातील कलह नष्ट करण्यासाठी तथागत बुद्धांनी धम्माचा प्रचार केला आहे. जगभरात शांती नांदावी म्हणून सर्वच बौद्ध भुक्कू कार्य करीत आहेत. बिहार राज्यातील बौद्धांच्या तीर्थक्षेत्राला बौद्धांच्या ताब्यात देऊन जगात वेगळा संदेश द्यावा अशी मागणी भन्ते डॉ उपगुप्त यांनी केली असल्याची माहिती भन्ते उपगुप्त यांनी दिली.
बुद्ध गया मुक्ती लढ्याला बौद्ध धर्मगुरूंनी प्राणांतिक उपोषण केले असून लवकरच हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशी प्रभावी मागणी त्यांनी केली.